PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

आरमोरी येथे आझाद समाज पार्टीची विषेश बैठक संपन्न.......


 

 

              आज दिनांक १६ सप्टे. रोज सोमवार ला आरमोरी येथील रेस्ट हाऊस मध्ये आझाद समाज पार्टी तालुका आरमोरी ची विषेश बैठक घेण्यात आली. सदर बैठकीला अध्यक्ष म्हणुन ऋषी सहारे तालुका अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी आरमोरी तालुका कार्याध्यक्ष म्हणून पुरुषोत्तम मैंद यांची नियुक्ती करण्यात आली.

 

सदर बैठकीमधे सविस्तर चर्चा करुन खालील मुद्दे घेण्यात आले.

 

१) लेटर हेड तयार करणे

२) ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करण्यात बाबत 

३) कामगार वर्गाकरिता आंदोलन करणे. कामगारांना, हमाल पेन्शन लागू करा. ५० वर्ष वयाची अट 

४) बांधकाम विभाग विरोधात आंदोलन

५) शालेय पोषण आहार वर भर देणे 

६) भरम साठ बिला संदर्भात एम एस ई बी वर आंदोलन करने 

 

               सदर बैठकीला आझाद समाज पार्टी आरमोरीचे तालुका अध्यक्ष ऋषी सहारे, पुरुषोत्तम मैद तालुका कार्याध्यक्ष, सुरेंद्र वासनिक ता.सचिव, शुभम पाटील ता. अध्यक्ष युवा आघाडी, स्वाती खोब्रागडे ता.महीला अध्यक्ष, नितीन भोवते शहर अध्यक्ष, पियूष वाकडे ता.उपाध्यक्ष युवा आघाडी, नितेश बगमारे, आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 1, 2024   

PostImage

रानटी हत्तींची पुन्हा आरमोरी तालुक्याकडे आगेकूच


देलनवाडीत दाखल : शिवणीत केले नुकसान

 

कुरखेडा : रानटी हत्तींच्या कळपाने वडसा वन विभागातील कुरखेडा परिसरात गेल्या महिनाभरापासून अक्षरशः धुडगूस घातला आहे. रानटी हत्ती दिवसा जंगला व सायंकाळी शेतात प्रवेश करून धान पिकाची नासधूस करीत आहेत.

 

सध्या हत्तींनी दादापूरच्या डोंगरावरून शिवणी परिसराकडे आपला मोर्चा वळविलेला आहे. 

 

रानटी हत्तींनी मागील १० दिवसांपासून दादापूर डोंगरावर ठिय्या मांडला होता. आता रानटी हत्तींच्या कळपाने शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेदरम्यान शिवणीत एन्ट्री केली. हत्तींनी धान पिकांची नासाडी केल्याची माहिती मिळताच देलनवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. मेहर, क्षेत्र सहायक एम, एच. राऊत, वनरक्षक आर. आर. सुरपाम, एस.आर. सहारे यांनी भेट देऊन पंचनामे केले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 31, 2024   

PostImage

भाकरोंडी येथील विद्यार्थ्याने बुध्दीचा वापर करून चक्क सेन्सर बनविला


आरमोरी: तालुका आरमोरी अंतर्गत अतिशय दुर्गम भागात एक छोटेसे गाव आहे भाकरोंडी या गावात जिल्हा परिषद शाळा 7 वी पर्यंत आहे याच शाळेत शिक्षण घेत असलेल्या संकल्प शरद जांभुळकर याने आपल्या वडिलांची जुनी असलेली मोटर सायकल पहिला आणि त्याने त्या गाडी वर आपल्या बुद्धी चा वापर करून चक्क सेन्सर बनविला ती गाडी जर साईड स्टॅन्ड वर उभी राहिली तर त्या गाडी चा इंजन अजिबात सुरूच होत नाही 

 

अश्या चिमुकल्याना जर शासनाने थोडा वाव दिला तर हे आपल्या जीवनात नक्कीच काही तरी अशस्वी होऊन आपल्या देशात काही तरी बदल घडून आणण्याचा प्रयत्न करतील या छोट्याशा संकल्प ची कामगिरी पाहून सर्व गावकरी व त्याच्या शाळेतील शिक्षक त्या चा कौतुक करीत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 21, 2024   

PostImage

आरमोरीत हजारो नागरिक रस्त्यावर, काही वेळ तणाव


युवती मारहाण प्रकरण : आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

 

आरमोरी येथे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मंगळवारी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.

 

गडचिरोली: मोबाईल चार्जरकरिता युवकांनी रेस्टॉरंटमध्ये धुडगूस घालून तेथे काम करीत असलेल्या १९ वर्षीय मुलीला अमानुष मारहाण केली होती. १५ ऑगस्टला घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद २० ऑगस्टला उमटले. या घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन केले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आरोपींना कडक शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली.

 

स्वातंत्र्यदिनी शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या एका १९ वर्षीय युवतीला सोहेल शेख, अयुब शेख यांनी मोबाईल चार्जरसाठी अमानुष मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सार्वत्रिक होताच जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी फरार आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली; परंतु या संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी २० ऑगस्टला विविध संघटनांनी मिळून आरमोरी बंदची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरातील बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते. या दरम्यान नागरिकांनी हजारोंच्या

संख्येने एकत्र येत आरोपी विरोधात घोषणा देत इंदिरा गांधी चौकात निषेध मोर्चा पोहोचला त्यानंतरच जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या नावे निवेदनही देण्यात आले. मात्र, यानंतरही शेकडो नागरिकांनी पोलिस ठाण्याकडे मोर्चा वळविला. यावेळी पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेरील दरवाजा बंद करून आत जाण्यापासून मोर्चेकऱ्यांना रोखले. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

 

यावेळी आ. कृष्णा गजबे, माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, भाजप तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, नंदू पेट्टेवार, भारत बावनथडे, विलास पारधी, अक्षय हेमके, काँग्रेस आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव छगन शेडमाके, विजय सुपारे, सागर मने, भूषण सातव, राजू अंबानी, संदीप ठाकूर, लक्ष्मी मने, वेणूताई ढवगाये, डॉ. संगीता राऊत, अर्चना गोंधोळे, विद्या चौधरी, योजना मेश्राम यांच्यासह विविध पक्ष आणि संघटनेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

 

आरमोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे आरमोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस निरीक्षक विनोद रहागंडले हे हद्दीत दारूविक्रीबाबात कडक धोरण असल्याचा दावा करीत असले तरी सर्रास दारूची विक्री सुरू आहे. मुलींच्या छेडछाडीच्याही तक्रारी आहेत.

युवतीला भररस्त्यातील रेस्टॉरंटमध्ये अमानुष मारहाण

करण्याची हिंमत दाखवून आरोपींनी पोलिसांना खुले आव्हान दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाणेदार रहांगडले कार्यपद्धतीत सुधारणा करतील का, असा सवालही यावेळी आंदोलकांनी केला.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 19, 2024   

PostImage

आरमोरी शहर उद्या कडकडीत बंद


 

आरमोरी : शहरातील शिवम कॅफे मध्ये युवतीला मारहाण केल्याचे प्रकरण आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार गजबे कानी पडताच त्यांनी तालुका मुख्यालयी धाव घेत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर घटना अतिशय निंदनीय आहे, आरोपींवर कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली असून शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय पदाधीकारी, विविध संघटनेच्या वतीने उद्या 20 ऑगस्ट रोजी घटनेतील आरोपीला शिक्षा व्हावी व निषेध नोंदविण्यासाठीआरमोरी शहर कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 17, 2024   

PostImage

आरमोरी : वैनगंगेच्या नदीपात्रात ईसमाची उडी घेऊन आत्महत्या


 

आरमोरी : येथील विठ्ठल मंदिर वार्डातील रहिवासी सुरेश फाल्गुन दोनाडकर (५०) या इसमाने आरमोरी येथील वैनगंगा नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० वाजताच्या सुमारास घडली. त्याचा आज १६ ऑगस्ट रोजीही थांगपत्ता लागला नव्हता.

 

प्राप्त माहितीनुसार सुरेश दोनाडकर याची पत्नी व मुलगी हे बाहेरगावी गेले होते. तो घरी एकटाच असताना दुपारी दीड वाजताच्या सुमारास घरून बाहेर पडले. पायीच वैनगंगा नदी गाठून वैनगंगेच्या पुलावरून उडी घेऊनत्याने आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना कळताचत्यांनी वैनगंगेच्या नदीपात्रात स्थानिक पोहणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधून शोधमोहीम राबविली. तसेच नाव चालविणाऱ्या नाविकांना हाताशी घेऊन तब्बल १० किलोमीटर पर्यंत जाऊन शोध घेतला. परंतु अद्याप पावेतो त्याचे प्रेत मिळाले नाही. मागील चार दिवसांपासून आरमोरी पोलिसांनी शोध मोहीम राबवली असून अजूनही सदर इसमाचे प्रेत हातात आले नाही.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 16, 2024   

PostImage

आरमोरी - वैरागड रोडवर मोटरसायकल आणि ट्रकच्या धडकेत नरेश सोनटक्के …


                                                                                      आरमोरी : श्री नरेश भाऊ सोनटक्के(55) श्रध्दा मेडिकल स्टोअर्स वैरागडचे संचालक वैरागड वरुन आरमोरी कडे जात असताना  काल रात्री अंदाजे 8.00 च्या दरम्यान अज्ञात ट्रक आणि मोटरसायकल यांच्या धडकेत त्यांचा आरमोरी - ठाणेगाव-  वैरागड रोडवर जागीच मृत्यू झाला. ते मागील तीस वर्षापासून औषध व्यवसायात कार्यरत होते, आज अचानक असे निघून जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाची संकट कोसळले आहे.तरी ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना व आप्त परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो

भावपूर्ण श्रद्धांजली


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 3, 2024   

PostImage

स्थानिक लोकप्रतिनिधी च्या दूर्लक्षतेमुळे आरमोरी तालुक्याचा विकास खुंटला माजी आमदार …


 

आरमोरी... तालुक्यात गेल्या दहा वर्षांत अनेक समस्या निर्माण झाल्या. त्या सोडविण्यासठी लोकप्रतिनिधी व शासनाची प्रयत्न केले नाही.त्यामुळे आरमोरी तालुक्याचा विकास खुंटला.शेतकरी व सर्वसामान्य जनता ही लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या धोरणामुळे त्रस्त आहे.असा असा आरोप माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला.

 

आरमोरी येथील पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार आनंदराव म्हणाले की शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सिंचनाच्या मोठया प्रमाणात सुविधां व्हाव्यात यासाठी आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव डोंगरगाव उपसा जलसिंचन योजना आपल्या काळात २० कोटी ५० लाख रुपयेची मंजूर करून आणली आपल्या काळात सिंचन योजनेच्या कामाला सुरुवात झाली. मात्र दहा वर्षाचा कालावधी लोटूनही अद्यापही सिंचन योजनेचे काम पूर्ण झाले नाही त्यामुळे हजारो शेतकरी आजही सिंचनापासून वंचित आहे मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही त्याचप्रमाणे आरमोरी तालुक्यातील कोसरी सिंचन प्रकल्प ही आपल्या काळात मंजूर झाला मात्र त्यातही अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कॅनालचें जे काम व्हायला पाहिजे ते कऱण्यात आले नाही. त्यामुळें पुराचे पाणी नाल्याला आल्यास शेतकऱ्याचे शेतात पाणी जाऊन मोठें नुकसान होत आहे.त्यामुळें सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या प्रकल्पाकडे लक्ष देऊन अधिकाऱ्याकडून काम पुर्ण करवून घेने हे स्थानीक लोकप्रतिनिधीं म्हणून आमदाराच काम आहे. मात्र गेल्या दहा वर्षात ते झाल्याच दिसत नाही.लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर अंकुश नाही ही वस्तुस्थिती आहे असेही ते म्हणाले.

 

तालुक्यात घरगुती आणि कृषीपंपाच्या विजेच्या समस्या मोठया आहेतं.२०२१.२२ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कृषी पंपाना विजेची जोडणी करण्यासाठी डिमांड भरली. मात्र चार वर्षाचा कालावधी लोटूनही अद्यापहीत्या शेतकरयांना विजेची जोडणी करून देण्यात आली नाही. या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः ऊर्जामंत्री असतानाही ही समस्या निकाली न निघणे हे शासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्दैव आहे. शेतकऱ्याचा प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. असा आरोपही माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी केला.

 

आरमोरी शहरात व तालुक्यात विजेची समस्या ही नेहमीची बाब बनली आहे आरमोरी तालुक्यासाठी १३२ के व्ही विज उपकेंद्र व आरमोरी शहराकरिता ५ केव्हीचे विज उपकेंद्र निर्माण होणे गरजेचे आहे मात्र स्थानिक लोकप्रतिनिधीनी याकडे दुर्लक्ष केले आहे आपण स्वतः याबाबत अधिकाऱ्याशी चर्चा करून शासनाकडे पाठपुरावा केल्याचेही त्यांनी सांगितले.

 

शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेले प्रश्न अजूनही दुर्लक्षित आहेत. शेतकऱ्यांना धान खरेदी करणे सुलभ हवे यासाठी मार्केटिंग फेडरेशनकडे गोदामांची सोय नाही.त्यामुळे गोदामाची निर्मिती करणे गरजेचे आहे .मात्र दहा वर्षात ते निर्माण करण्यात आले नाही . याशिवाय रामसागर तलावाच्या सौंदर्यीकरनाचा प्रश्न, रवि मुलुरचक गावाच्या समायोजनाचा प्रश्न, आरमोरी शहरांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, गडचिरोली आरमोरी राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था, दवंडी भाकरोंडी रस्ता,सूर्यडोंगरी ते देलोडा रस्ता, पाथरगोटा ते भगवानपुर रस्त्याची झालेली दुरावस्था, दवंडी ते रांगी रस्ता झाला मात्र रस्त्यावरिल नाल्यावर पुल झाले नाही, तालुक्यात अनेक नदी घाटातून रेतीचे उत्खनन झाले. रेतीच्या वाहतुकीमुळे रस्ते खराब झाले .मात्र रेतीतून मोठया प्रमाणात महसूल मिळूनही खनिज विकास निधीतून उखडलेल्या रस्त्याची दुरुस्ती झाली नाहीं. असे अंनेक प्रश्न प्रलंबित असून स्थानीक लोकप्रतिनिधी म्हणून आमदाराला गेल्या दहा वर्षांत ते पुर्ण करता आले नाही त्यामुळें तालुक्याचा विकास खुंटला असा आरोपही माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी केला.

 

पत्रकार परिषदेला माजी जि .प. सभापती विश्वास भोवते, आनंदराव आकरे ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे ,शालिक पत्रे, दत्तू सोमनकर, दिलीप घोडाम ,भोलानाथ धानोरकर, अनिल किंरमे, चिंतामण ढवळे, हिवराज बोरकर, अंकुश गाढवे, बेबी सोरते ,अर्चना मडावी, सारंग जांभुळे, काशिनाथ पोटफोडे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 27, 2024   

PostImage

Armori news : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार


 गडचिरोली, ब्यूरो. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तरुणीवर अत्याचार केल्याचे प्रकरण आरमोरी येथे समोर आले आहे. हा प्रकार मागील दीड वर्षांपासून सुरू असल्याचे उघड झाले आहे. जेव्हा या तरुणाने लग्नाला नकार दिला. तेव्हा या पीडित तरुणीने आरमोरी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली असून, आरोपी फरार आहे. शुभम बबन सोरते (वय 27, रा. आरमोरी-बर्डी) असे फरार आरोपीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभमची मागील दीड वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम, फेसबुक) माध्यमातून लगतच्या जिल्ह्यातील एका तालुक्यातील 21 वर्षीय तरुणीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये होऊन नंतर प्रेम जुळले.

यातूनच त्यांच्यात सातत्याने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीची 2023 मध्ये सोशल

मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. 2023 पासून ते मे 2024 पर्यंत सुरू असलेल्या प्रेमादरम्यान त्यांनी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. तत्पूर्वी या दोघांनी प्रेमाच्या व लग्नाच्या आणाभाकासुद्धा खाल्ल्या. मे 2024 नंतर सदर तरुणी ही 21 वर्षांची होताच फिर्यादी तरुणीने लग्न करण्यासाठी शुभम सोरते याच्याकडे आग्रह धरला. मात्र, शुभमने लग्नाला नकार दिला. सदर तरुणीने दोनदा तडजोडीअंती दोन्ही घरच्यांच्या मंडळींची सभा लावली.

 

 

मात्र, शुभमचा लग्नाला विरोध कायम होता. पीडित तरुणीने 24 जुलैला आरमोरी पोलिस स्टेशन गाठून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून आरमोरी पोलिसांनी आरोपी शुभम सोरते याच्या विरोधात भादंवी कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून, आरमोरी पोलिसांद्वारे त्याचा शोध सुरू आहे. अधिक तपास ठाणेदार विनोद रहांगडाले यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक संगीता मसराम करीत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 19, 2024   

PostImage

शेळीच्या पिलामागे धावला अन् नाल्यात वाहून गेला


 

हर्ष साखरे सुपर फास्ट बातमी संपादक 9518913059

कुलकुलीतील घटना : मृतदेह आढळला

आरमोरी: नाल्याच्या पाण्यात वाहून जात असलेल्या शेळीच्या पिलाला वाचविण्याच्या प्रयत्नात शेळीपालक वाहून गेल्याची घटना आरमोरी तालुक्यातील कुलकुली येथे बुधवारी सायंकाळी घडली. विठ्ठल हणमंत गेडाम (५४) असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

 

आरमोरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी बहुल कुलकुली येथील विठ्ठल गेडाम यांच्याकडे तीस ते पस्तीस शेळ्या आहेत. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ते गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या नाल्याच्या पलीकडे शेतालगतच्या जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. बुधवारी कुलकुली परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने नाल्याला अचानक पूर आला. पाणी आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याने शेळ्यांना सोबत घेऊन घराकडची वाट धरली. नाल्याजवळ आल्यानंतर शेळीचे पिल्लू अचानक नाल्यात उतरले. त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना विठ्ठल हा सुद्धा नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला.

 

सदर घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबविली. परंतु त्याचा पत्ता लागला नाही. गुरुवारी पुन्हा सकाळी शोधमोहीम राबविली असता सकाळी ७ वाजताच्या सुमारास नाल्यातील रेतीत अर्धवट झाकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. सदर घटनेने गावात शोककळा पसरली आहे. मृतक विठ्ठल गेडाम यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा आहे. मालेवाडा पोलिस तपास करीत आहेत.

 

 

 

नाला ओलांडताना काळी घ्या

 

बऱ्याच नागरिकांची शेतजमिन नाल्याच्या पलीकडे आहेत. पावसाळ्यात नाल्यांना पूर येते. बऱ्याचवेळा नाल्यातील पाण्याचा अंदाज शेतकऱ्यांना येत नाही. त्यामुळे नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटना यापूर्वी सुध्दा घडल्या आहेत. नाल्यात जर जास्त पाणी असेल तर विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 17, 2024   

PostImage

आरमोरी: टेम्पोच्या धडकेने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू


 आरमोरी : चालकाची निष्काळजी व क्लिनरच्या चुकीमुळे टेम्पोखाली सापडलेल्या दोन महिलांपैकी एकीचा उपचारादरम्यान १५ जुलै रोजी रात्री सव्वा आठ वाजता मृत्यू झाला.

 

आरमोरी येथे १८ जून रोजी गडचिरोलीहून नागपूरकडे दूध वाहतूक करणारा टेम्पो (एमएच ४०-सीटी १७१६) जात होता. आरमोरीत रात्री साडेआठ वाजता रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून चालक नाश्ता करण्यासाठी गेला.

 

क्लिनर मात्र केबिनमध्येच बसून होता. गाणी ऐकण्यासाठी त्याने वाहन सुरू केले. ते गीअरमध्ये असल्यानेसमोर जात शतपावली करताना गप्पा मारत थांबलेल्या कल्पना अरुण गोवर्धन (४५) व कवळाबाई लोकमित्र मेश्राम (७२) या दोघींच्या अंगावर टेम्पो आला. पाठीमागून टेम्पाने धडक दिल्याने दोघीही जखमी झाल्या.

 

 

नागपूर येथे खासगी दवाखान्यात एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर कल्पना गोवर्धन यांची अखेर १५ जुलै रोजी प्राणज्योत मालवली. कवळाबाई मेश्राम यांच्यावर नागपूर येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 16, 2024   

PostImage

मेंढेबोडीत महसूलच्या जमिनीवर अतिक्रमण


 

गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील मेंढेबोठी चक, हिरापूर चक, डोंगरतमाशी बस स्टॉपच्या मागच्या बाजूला येथील महसूल विभागाच्या जागेत मोठया प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. ते हटवून रोपवन लागवड करून देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव छगन शेडमाके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने १५ जुलैला तहसीलदार प्रीती डुडुलकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

 

मेंढेबोडी चक, हिरापूर चक येथील महसूल विभागाच्या जंगल जागेवर गावातील अनेक नागरिकांनी अनधिकृत अतिक्रमण करून जागा बळकावली आहे. यामुळे जंगलाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागले आहे. दिवसेंदिवस जंगलतोड करून

 

करण्यात येत असलेल्या अतिक्रमणामुळे भविष्यात जंगल राहणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यात मोठी अडचण निर्माण होणार आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता महसूल विभागाच्या जंगलाच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण यथाशीघ्र काढून या जागेवर रोपवन लागवड करून देण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी राकेश गेडाम, सत्यभामा अलोने, प्रभू गेडाम, ईश्वर कांबळे, राजेश्वर गेडाम, पांडुरंग कांबळे, कृष्णकुमार कोटांगले, कालिदास गेडाम, संदीप मेश्राम, आदी उपस्थित होते.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 15, 2024   

PostImage

तीन महिने उलटूनही रोहयो कामाची मजुरी थकली शेतकरी शेतमजूर आर्थिक …


 

आरमोरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आरमोरी तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे करण्यात आली, मात्र केलेल्या कामाची मजुरी मिळाली नसल्याने हजारो शेतकरी, शेतमजूर आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

 

आरमोरी तालुक्यात कोणताच मोठा उद्योग नसल्यामुळे ग्रामीण भागांतील शेतकरी शेतमजुरांच्या रिकाम्या हातांना काही प्रमाणात रोहयोच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होत असते. ग्रामपंचायत व ग्रामसभेच्या माध्यमातून तालुक्यात मजगी, पाणंद रस्ते, बोडी, तलाव खोलीकरण, वनतलाव बांधकाम करणे, नैसर्गिक रोपांचे एकेरीकरण, मिश्र रोपवाटिका तयार करणे आदी विविध कामे करण्यात आली. मात्र केलेल्या कामाची मजुरी दोन ते तीन महिने होऊनही मजुराच्या बँक खात्यात जमा करण्यात आली नाही. सध्या तालुक्यात खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. मात्र केलेल्या कामाची मजुरी थकल्याने खत, रोवणी मजुरांची मजुरी कुठून करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. केलेल्या कामाची मजुरी अजूनपर्यंत मिळाली नसल्यामुळे मजुरांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.

 

मजुरांचा कामावर येण्यास नकार

 

आदिवासी भागातील ग्रामसभांना अनेक गावांत मिश्र रोपवाटिका तयार करण्याचे काम सुरू करावयाचे आहे. मात्र मजुरी थकल्याने मजूर कामावर येण्यासाठी नकार देत आहेत, त्यामुळे रोहयोंतर्गत केलेल्या कामाची मजुरी देण्यात यावी. प्रशासनाने याकडे लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामसभा येंगाडाचे ग्रामरोजगार सेवक मुन्नासिंग चंदेल यांनी केली आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

May 3, 2024   

PostImage

अपघातात जखमी 'त्या' अभियंत्याचा मृत्यू


 

डोंगरगावजवळ चारचाकी वाहनाने चिरडले

 

वैरागड : कोनसरी येथील लॉयड्स मेटल कंपनीत काम करणारे कनिष्ठ अभियंता युवराज अरविंद लाकडे यांचा आरमोरी-गडचिरोली मार्गावरील डोंगरगावजवळ भीषण अपघात झाला होता. त्यांच्यावर सुरुवातीला आरमोरी उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार केल्यानंतर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ते कोमात गेले होते. दरम्यान ३० एप्रिल रोजी रात्री ११:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

 

मूळचे वैरागड येथील रहिवासी युवराज अरविंद लाकडे हे काही दिवसांपासून कोनसरी येथील लॉयड्समेटल कंपनीत अभियंता पदावर कार्यरत होते. २६ एप्रिल रोजी वैरागडला लग्न समारंभासाठी आले होते. २८ एप्रिल रोजी कंपनीत महत्त्वाचे काम निघाले. त्यामुळे ते सकाळच्या सुमारास कर्तव्यावर निघाले. गडचिरोली येथे पोहोचल्यानंतर त्यांना वरिष्ठ अधिकारी हे कार्यालयात हजर नसल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. तेव्हा ते पुन्हा वैरागडकडे जेवणासाठी निघाले. दरम्यान डोंगरगावजवळ एकामागून येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 29, 2024   

PostImage

मोहझरी येथील जिओ टॉवरचा नेटवर्क गायब, नागरिक संतप्त


मोहझरी: आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथील  जिओचा टावरमधे गेल्या अनेक दिवसापासून तांत्रिक बिघाड झाला असून त्यामुळे मोहझरी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना एकमेकांना संवाद साधण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे .याबाबत जिओ कंपनीच्या ऑपरेटरला फोन करून ही समस्या कळविण्यात आली परंतु अजून पर्यंत त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे सतत नेटवर्क गायब होत असल्यामुळे हि समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवली जात आहे.

 

मोहझरी गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय मध्ये  सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने होत असतात तसेच या गावांमध्ये जिल्हा परिषद शाळा ,महाविद्यालय असल्यामुळे अशा ठिकाणी मोबाईल नेटवर्कची अत्यंत आवश्यकता असते परंतु गेल्या काही दिवसापासून दिवसातून बरेचदा मोबाइल नेटवर्क गायब होत असल्यामुळे नागरिक त्रासलेले आहेत. प्रति महिना 300 रू 500 रू रुपयाचा jio रिचार्ज प्रत्येक नागरिक करीत असतो परंतु दररोज नेटवर्क गायब होत असल्यामुळे मोबाईल खेळाचे वस्तू बनल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे.

कुटुंबातील आपल्या मित्र मंडळीला मोबाईल वरून फोन लावल्यास कधीही नेटवर्क गायब होत असल्यामुळे फोन कट होत असतो किंवा अत्यंत महत्त्वाचे बोलणे होत नाही त्यामुळे मोहझरी आणि परिसरातील नागरीक  जिओ कंपनीच्या अशा भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करत आहेत.

आज सर्व कामे शासकीय कामे ऑनलाईन पद्धतीने होत असतात परंतु मोहझरी येथील जिओ  टावरचा मोबाईल नेटवर्क गायब होत असल्यामुळे शासकीय कामे करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. जिओ कंपनी सर्वात वेगवान इंटरनेट डाटा कस्टमरला पूरवित असल्याचा कांगवा करीत असते देशाने त्याच उद्देशाने अनेक नागरिकांनी जिओची सिम घेतलेली आहे परंतु त्यांचा मारलेला रिचार्ज वाया जात असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे मोहझरी येथील जिओ टावर तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी मोहझरी  आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे अन्यथा आंदोलन करू असा इशारा जिओ कंपनीला नागरिकांनी दिला आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 8, 2024   

PostImage

मोहझरी,शिवणी ,सुकाळा, नागरवाही, देलनवाडी, मानापुर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात केली …


आरमोरी: सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे उखाडा निर्माण झाला आहे परंतु विजेचा लपंडाव मागील काही दिवसापासून मोहझरी,शिवणी ,सुकाळा, नागरवाही, देलनवाडी, मानापुर, अंगारा , मालेवाडा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोड शेडिंग सुरू केल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. तसेच यावर्षी मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड केली आहे त्या धान्याला पाणी देण्याकरिता विजेची अत्यंत आवश्यकता असते परंतु लोडशेडिंगच्या नावाखाली काही तासाकरिता विज बंद करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक हातात येतात की नाही अशी शंका या विजमुळे निर्माण झालेली आहे. 

 

 उन्हाळ्याची चाहूल लागल्याने नागरीक घरोघरी पंखे लावून आराम करत असतात परंतु विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिकांना गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याकरिता संपूर्ण आरमोरी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतने लोडशेडिंगच्या विरोधामध्ये एक निवेदन सादर करून महावितरणकडे देण्याचे करावे जेणेकरून हा विजेचा लपंडाव बंद होईल याकरिता सर्व ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे.

 

 आपल्या विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज निर्माण होत असून सुद्धा स्थानिक पातळीवर  विजेची कमतरता दाखवून वेळोवेळी लोड शेडिंग मोठ्या प्रमाणात केली जात आहे. म्हणजे आपल्या विदर्भात वीज तयार होऊन सुद्धा येथील लोकांना अंधारामध्ये जीवन काढावे लागत आहे ही एक मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी विजेच्या विरोधामध्ये जन आंदोलन उभे करून महावितरणला वीज सुरू ठेवण्याकरिता आग्रहाची भूमिका घ्यावी .

 

वरील बाबीचा गंभीरपणे महावितरणने विचार करून आरमोरी तालुक्यातील सर्व गावाला वीज 24 घंटे विज पुरवठा करावा अशी मागणी आरमोरी तालुक्यातील सर्व नागरिकांची प्रमुख मागणी आहे. अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 17, 2024   

PostImage

शंकरनगर परिसरात जंगली हत्तींनी पुन्हा घातला धुमाकूळ


तत्काळ नुकसानभरपाईची मागणी

 

मक्यासह कारले पीक उद्ध्वस्त

 

 

 

 देसाईगंज, (ता. प्र.). मागील दोन महिन्यांपासून जंगली हत्तींनी तालुक्यात ठाण मांडले आहे. चार दिवसांपूर्वी तालुक्यातील कोंढाळा, शिवराजपूर परिसरात पिकांची नासधूस केल्यानंतर बुधवारी रात्रीच्या सुमारास याच भागातील शंकरनगर परिसरात जंगली हत्तींनी धुमाकूळ घालून उभ्या मक्याच्या पिकासह कारल्याचे प्रचंड नुकसान केले  आहे.

 

22 च्या संख्येत असलेल्या जंगली - हत्तींनी मागील दोन महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यातील घनदाट जंगलात ठाण मांडले आहे. हत्तींनी डोंगरगाव, चिखली, रिठ, शिवराजपूर, कोंढाळा - परिसरात फिरुन शेतकऱ्यांचे अतोनात - नुकसान केले. 11 फेब्रुवारी रोजी हत्तींनी - उसेगाव जंगल परिसरात मोर्चा वळविला - होता. मंगळवारी हत्ती कक्ष क्रं. 91 मध्ये आढळून आले होते. यावेळी इंटियाडोह - धरच्या पाण्यावर रोवणी झालेल्या धानात हत्तींनी धुडगूस घालून मोठ्या प्रमाणातनुकसान केले होते. 

 

तर बुधवारच्या रात्री शंकरनगर गाव परिसराकडे हत्तींनी मोर्चा वळविला. निरंजन महिंद्र हलदार, रविन बाला, सुजय विश्वास, बिधान मंडल, निर्मल मिस्त्री, गौरंग मिस्त्री, कृष्णा माझी, समीर विश्वास या शेतकऱ्यांच्या कारले, मक्याच्या पिकांमध्ये कळप शिरला. या हत्तींनी पिक फस्त करण्यासोबत पायदळी तुडवल्याने पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

 

20 ते 22 हत्तींचा कळप रात्रीच्या वेळी शेतात शिरतात. यापूर्वीसुद्धा डिसेंबर 2023 मध्ये हत्तींनी शंकरनगर येथे एका महिलेला ठार केले होते. त्यामुळे हत्तींच्या वाट्याला जाण्याची हिंमत शेतकरी करताना दिसत नाहीत. मात्र हत्तींमुळे झालेल्या नुकसानाची तत्काळ भरपाई देऊन हत्तींना पिटाळून लावण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 4, 2024   

PostImage

Armori news:फसलेले ट्रॅक्टर चालकाच्याच अंगावर उलटले


 

 आरमोरी : शेतात कापणी केलेल्या तुरी घरी आणण्यासाठी जात असताना बांध्यांमध्ये ट्रॅक्टर फसले. चिखलातून ते बाहेर काढताना ट्रॅक्टर उलटले. चारही चाके वर झाल्याने यात दबून चालकाचा मृत्यू झाला. ही घटना आरमोरी तालुक्याच्या ठाणेगाव येथील शेतशिवारात शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता घडली.

 

सुरेश दुधराम लट्ठे (५०), रा. ठाणेगाव असे ठार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. सुरेश लट्ठे हे रोजंदारीने ट्रॅक्टर चालविण्याचे काम करीत होते. शुक्रवारी ते ठाणेगाव येथील मंगेश जुवारे यांच्या सासऱ्यांच्यामालकीचे ट्रॅक्टर चालविण्यासाठी व ऋषी नैताम यांच्या शेतातील तुरी आणण्यासाठी गेले असता ट्रॅक्टर व ट्रॉली चिखलात फसली. दुसऱ्या ट्रॅक्टरमुळे कशीतरी ट्रॉली निघाली. परंतु, इंजिन फसले. सदर रोवणी हंगामसुरू असल्याने चाकांना आधीच कॅजव्हील लावले होते. कॅजव्हीलमध्ये लाकडी फाटे टाकून ती बाहेर काढत असतानाच नियंत्रण सुटले व दुर्दैवाने सुरेश लट्ठे हे त्यात दबले. त्याचा जागीच मृत्यू झाला

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 11, 2024   

PostImage

शेकडो नागरिकांनी घेतले निशुल्क आयुर्वेद शिबिराचे लाभ.


 

आरमोरी :- सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य गुरुवर्य कै. प्र. ता. जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा ब्रम्हपुरी महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी तथा युवारंग लोकहीत संघटना ,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क वातरोग, त्वचा रोग श्वसन रोग आयुर्वेद शिबिराचे दि.१० जानेवारी २०२४ ला ठीक १०:०० ते २:०० वाजेपर्यंत स्थळ:- महात्मा गांधी महाविद्यालय ,आरमोरी येथे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन शिक्षण महर्षी मा. भाग्यवानजी खोब्रागडे तर अध्यक्ष म्हणुन निमा संघटनेचे अध्यक्ष मा.डॉ.हिरालाल मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा सर , डॉ. महेश कोपुलवार मा. प्रा. डोर्लीकर ,

डॉ. शितल सुपारे सर उपस्थित होते याप्रसंगी नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या युवारंग लोकहीत संघटनेचे अध्यक्ष राहुल जुआरे व राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून लोकहिताचे कार्य घडविणारे प्रा. सदानंद सोनटक्के सर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला  

या शिबिरामध्ये आरमोरी तालुक्यातील शेकडो रुग्णांनी सहभाग घेतला सर्व रुग्णाची तपासणी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा ब्रम्हपुरी च्या तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते पार पडली ज्यामध्ये डॉ.नरेश देशमुख , डॉ.रमेश कारवट , डॉ. सुनील नाकाडे , डॉ.रामेश्वर राकडे , डॉ.गिरीश शेंडे , डॉ.रोहित चिलबुले , डॉ.सुप्रिया नाकाडे , डॉ. अंजू राऊत , डॉ.अर्पणा कन्नमवार , डॉ .श्वेता राखडे डॉ.प्रणय कोसे ,डॉ.हिरालाल मेश्राम डॉ. श्रुती दांडगे ,डॉ. शितल सुपारे डॉ. ओमप्रकाश नाकाडे ,डॉ.खोब्रागडे, डॉ. अनोले ,डॉ.सतीश निमजे ,डॉ .सुनिता देशमुख, डॉ. सोनम लीचडे या निशुल्क शिबिरामध्ये रुग्णांना तत्कालीन फायदा होण्याकरिता आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा ज्यामध्ये अग्निकर्म विद्यकर्म, स्वेदन ,स्नेहन ,रक्तमोक्षण तत्काळ करून देण्यात आले व रुग्णांना ५ दिवसाचे औषध मोफत देण्यात आले या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री गजानन आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी क्लिनिक ब्रम्हपुरी चे कर्मचारी , युवारंग लोकहीत संघटना ,आरमोरी चे सदस्य व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले .


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 8, 2024   

PostImage

9 जानेवारी रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण अभियान


रुमदेव सहारे सहसंपादक

गडचिरोली,(जिमाका)दि.08 : 9 जानेवारी 2024 रोजी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात गडचिरोली येथे होत आहे. या अभियानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राहणार आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 11.00 वा. एमआयडीसी मैदान, कोटगल रोड, गडचिरोली येथे होत आहे.

    यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम,  उद्योग मंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
यावेळी विविध विकास कामांचे भुमिपुजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
*या विकासकामांचे होणार लोकार्पण व भूमीपूजन*
100 मोबाईल टॉवर, प्राथमिक आरोग्य पथक (ग्यारापत्ती)
मानव विकास मिशन अंतर्गत 08 एकल गोडाऊन (आंबेझरी, कांदाळी, राजगोपालपूर, डार्ली, नरोटीचक, धोडराज, होड्री व गोंगवाडा), एकल सेंटर (मौजा- मेंढा ता. धानोरा, एकल सेंटर मो. कुरुड ता. देसाईगंज), आदिवासी विभागाचे शाळा व वसतिगृह, तलाव सौदर्यींकरण, नगर परिषद प्रशासकीय इमारत
चामोर्शी तालुका क्रिडांगण, धानोरा तालुका क्रिडांगण, चामोर्शी नगर पंचायत प्रशासकीय भवन, 
वघाडा-सायगाव-शिवणी-डोंगरगाव मोठया पुलाचे बांधकाम करणे (ता. आरमोरी), चोप-तमाशीटोला ते वडसा मोठया पुलाचे बांधकाम करणे. (ता. वडसा) सानगडी-गोठणगाव-कुरखेडा-मालेवाडा-रामा-मोठया पुलाचे बांधकाम करणे (ता. धानोरा), सानगडी- गोठणगाव-कुरखेडा-मालेवाडा-रामा-ची सुधारणा करणे (ता. कुरखेडा),
मौशीखांब-वडधा-शंकरपूर-कोरेगाव रस्ता ची रुंदीकरणासह सुधारणा करणे. (ता. वडसा),  मोशीखांब-वडधा-शंकरपूर-कोरेगाव रस्ता सुधारणा करणे (ता. वडस, वडसा-नैनपुर-कोकडी रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे (ता. वडसा), कुरखेडा-वैरागड रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (ता. आरमोरी)  मौशीखांब-
वैरागड-पळसगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (ता. आरमोरी),  मौशीखांब-
वैरागड-पळसगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (ता. आरमोरी),  वडधा- सायगाव-शिवणी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (ता. आरमोर, NH-353 C शिवराजपुर- उसेगाव- मोहटोला किन्हाळा रस्ता दजोन्नोती करणे (ता. वडसा), MRL-01- आमगाव-गांधीनगर रस्ता दजोन्नोती करणे (ता. वडसा), दवंडी-रांगी रस्ता दजोन्नोती करणे (ता. आरमोरी), कुलकुली- अंगारा रस्ता दजोन्नोती करणे (ता. आरमोरी), भांसी-माजिटोला रस्ता दजोन्नती करणे (ता. आरमोरी),डोंगरमेन्ढा रस्ता दजोन्नती करणे (ता. आरमोरी), मार्कण्डा देव पुननिर्माण कार्य,
मार्कण्डा देवस्थान नुतनीकरण कार्य (राज्य शासन), चपराळा देवस्थान (ता. चामोर्शी) पर्यटन विकास (अरतोंडी) पर्यटन विकास (कलापूर) पर्यटन स्थळ विकास (ता. अहेरी)  रामदेगी (ता. चिमूर) पर्यटन स्थळ विकास, (सोमनूर) पर्यटन स्थळ ता. (सिरोंचा), कचार गड तिर्थ क्षेत्र विकास (ता. सालेकसा जि. गोंदिया)
गडचिरोली तलाव सौदर्यीकरण, नगरपरिषद प्रशासकीय इमारत.